येत्या 7 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत वेगळ्या विदर्भासाठी रणशिंग फुंकण्यात येणारआहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रदूषण व कुपोषण संपविण्यासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगारासाठी एकच उपाय म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करण्याची गरज आहे, ही मागणी घेऊन जवळपास सहाशे कार्यकर्ते राजधानी दिल्लीत आंदोलन करणार आहेत.
स्वतंत्र विदर्भ राज्य संदर्भातील आंदोलनासंदर्भात आज राजधानी दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये विदर्भ आंदोलनाचे नेते एडवोकेट वामनराव चटप यांच्यासह युवा आघाडी विदर्भ प्रदेश समितीचे प्रमुख मुकेश मासुरकर सहभागी झाले होते. सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यादरम्यान संसदेवर हल्लाबोल करण्याकरिता करण्यात येणार आहे.
0 Comments