कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून दसरा चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे,अमल महाडिक आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्यजित उर्फ नाना कदम यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जाताना प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतं की, भाजप या पोटनिवडणुकीत विजयी होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. छोट्या-छोट्या गटाच्या बैठका होऊ लागल्या आहेत.
0 Comments