कळंब! खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी; अठ्ठावीस जण जखमी


हासेगाव इटकुर पारा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खड्ड्यांमुळे दोन महिन्यात घडलेल्या किरकोळ अपघातात २८ जण गंभीर जख्मी झाले असून कळंबहून किराणा साहित्य घेऊन येत असताना  दुचाकी खड्ड्यात आदळून तालुक्यातील इटकुर येथील महादेव शिंदे (वय -४७) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वजनिक बांधकाम विभागाला आणखीन किती नागरिकांचा जीव घेईचा आहे. त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती होईल असे संतप्त सवाल भाजपचे नेते कैलास शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे दुचाकीस्वरांना त्रासदायक होऊ लागले आहे. रहदारी मोठ्या प्रमाणत असल्याने प्रत्येकजण खड्डे चुकवीत मार्ग काढीत गाव, घर गाठण्याच्या प्रयत्न करीत आहे. खड्डे चुकविताना दोन महिन्यात घडलेल्या किरकोळ अपघातात २८ जणाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. या मार्गाची डेंजर झोन म्हणून ओळख झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देण्यास तयार नाही. तालुक्यातील इटकुर येथील महादेव शिंदे हे कळंब हून गावाकडे येत होते. या मार्गावरील कोठाळवाडी पाटीजवळ खड्डा चुकवित असताना दुचाकी लहान दगडावरून घसरली. खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत दुर्देवी घटना असून केवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाला आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे.

Post a Comment

0 Comments