राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आदमी पार्टीने दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात आम तक्रार केली होती. आम आदमी पार्टीच्यावतीने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोगस मजूर असल्याचे व मुंबई बँक आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आय पी सी कलम १९९,२००,४०६, ४१७, ४२०,४६५, ५६८ आणि १२० (b) कायद्यांतर्गत प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देत असा आरोप केला आहे की, हे सगळं सूडभावनेनं केलं जात आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर टीका करत असल्यानं हा गुन्हा दाखल केला जात आहे. याआधी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. सभागृहात याबाबत मी सांगणार आहे. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एसएमएस पाठवले गेले असा आऱोप दरेकरांनी केला.
0 Comments