वैराग! भोगावती नदीपात्रातून वाळू उपसा सहा लाख तीन हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त


वैराग/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील ढोराळे गावाजवळ भोगावती नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्याकडून ६ लाख ३ हजाराचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला असून ५ जणांवर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर शिंदे यांनी वैराग पोलिसात दिली आहे.

या विषयी सविस्तर असे की, भोगावती नदी पात्रातून अवैधरित्या वाळू होत आहे अशी गुप्त बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार वैराग पोलिसांनी ढोराळे गावालगत भोगावती नदी पात्रात पाच मार्च रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान पाहणी केली, असता न्यू हॉलड कंपनीचा  बिगर नंबरचा एक ट्रॅक्टर २ ट्रेलर सह नदीपात्रात आढळून आला. या वाहनाचा ट्रॅक्टर चालक वैभव नारायण चोरमले (वय 23), रावसाहेब विष्णू देशमुख (वय 30), दादा विष्णू करंडे (वय 25) , भानुदास देशमुख (वय 35) व  विष्णू माळी (वय 40) या पाच जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे माहीत असताना देखील स्वतःच्या फायद्याकरता संगनमताने पाच जणांनी नदीपात्रातील वाळू अवैधरित्या उपसा करताना आढळून आले त्यांच्याकडे वाळू उपसा ची कोणतीही रीतसर परवानगी नव्हती. पाच जनावर वैराग पोलिसात पर्यावरण अधिनियम कलम 15 व 9 भारतीय दंड संहिता कलम 34 व 379 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments