डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा घेणार गोव्याच्या 'मुख्यमंत्री' पदाची शपथ; 'या' दिग्गजांची राहणार उपस्थिती

 

पणजी :

  विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर तब्बल 15 दिवसानंतर काळजीवाहु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  यांचा शपथविधी सोमवारी (उद्या) संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाशासित सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती काळजीवाहु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी दिली आहे.

'या' स्टेडियममध्ये होणार भव्य सोहळा : गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य अशा स्वरूपात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी बांबोली येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी पार पडली आहे. येथे गोवा विधानसभा संकुलाची खास प्रतिकृती उभारण्यात आली असून येथूनच काळजीवाहु मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.

'हे' नेते राहणार उपस्थिती : सोहळ्याला खास निमंत्रितांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाशासित सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व धर्माचे धर्मगुरू तसेच गोव्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना खास आमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय गोव्यातील नागरिकही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments