सोलापूर! मटका बुकीवर विशेष पथकाची कारवाई


सोलापूर/प्रतिनिधी:

शहर परिसरात पान दुकानात मटका नावाचे आकड्याचे जुगार खेळायला लावणाऱ्या पान दुकानदारांवर पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरूवार दि. १७ मार्च रोजी घडली.

जमीर मेहबुब शेख (वय ३४ मुरारजी पेठ), रामसिंग नागनाथसिंग गैर (वय ६२ रा. सलगरवाडी), रमेश भगवानदास शहरी (वय ६०, साठे पाटील), जावेद जिलानी शेख (वय ४३, रा. थोबडेवस्ती देगांव नाका सोलापूर), जयसिंग तायप्पा कारंडे (वय ५२, सलगरवाडी), पांडुरंग लक्ष्मण वाघमोडे (वय ६२, रा. देगांव नाका), संतोष शिवाजी देवकते (वय ५०, रा. उत्तर कसबा), प्रदीप वसंत महाजन (वय ५५, गुजरातीभवन जवळ), नितीन शिवशंकर वरनाथकर (वय ४५, काडादी चाळ), संभाजी सोपान कदम (वय ६५, रा. पांडुरंग वस्ती) या सर्वजणांनी रामलाल चौक, भैय्या चौक पोस्टा ऑफिस समोर सिटी बसस्टॉपच्या बाजुला काडादी चाळ समोर जाधव पान शॉप बाजुला रेल्वेस्टेशन गणेश हॉटेलच्या बाजुला हुमा मेडिकलच्या मागे अशा ठिकाणी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांकडून पैसे घेवून दुप्पर पैशाची आमिष दाखवून आकड्यावर पेज लावण्यास भाग पाडून मटका नावाचा जुगार चालवत असताना सोलापूर शहर पोलीस आयुक्तांचे विशेष पथकाने छापा टाकला असता मिळून आले त्यांच्याकडून २३ हजार ७३५ रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.

 यांच्या विरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात वाजिद पटेल यांनी फिर्याद दिली त्यानुसार नोंद करण्यात आली पुढील तपास हवालदार नदाफ करीत आहेत तसेच सुभाष शिवाजी गायकवाड (वयः ३१, रा. टाकळीकर शेत विजापूर रोड सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. याने नडगिरी पेट्रोल पंपाच्या समोर सुभाष पान शॉप नावाचे पान दुकान सुरू करून त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून आकड्यावर जुगार लावून कल्याण नावाचा मटका घेत असल्याचे सम जल्याने पोलीसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मटका घेण्याचे साहित्य असा एकूण २५० रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला याबाबत पोलीस शिपाई अमृत गुंडप्पा सुरवसे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक गवसाने करीत आहेत.

Post a Comment

0 Comments