भूम/प्रतिनिधी:
भूम तालुक्यातील ईट येथील गोलाई चौकाच्या पुढे परीसरात लोहारा ग्रामस्थ महेश गरड यांनी बुलेट मोटार सायकल क्रमांक एम एच १६ बी एन १०२० ही निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होवुन समोरुन येणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एम एच २० बी एल १९६९ ला समोरुन धडकली.
या अपघातात बससह त्या मोटार सायकलची मोडतोड होवुन आर्थीक नुकसान झाले. अशा मजकुराच्या बस चालक- संतोष लोंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम २७९, ४२७अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास भूम पोलीस करत आहेत.
0 Comments