"जिंदगी बडी होनी चाहिए,लंबी नहीं - राजा माने


शेवटी आपल्या जीवनात असते तरी काय? केवळ जगण्यासाठी माझा जन्म नाही तर काही तरी चांगले करुन दाखविण्यासाठी माझा जन्म आहे,हे ज्याला उमजले त्याचे जीवन सार्थकी लागले! "चांगले" याचाही अर्थ जीवनाचा प्रवास शिकवत राहतो..याच प्रवासात " नेकी कर,दर्यामे डाल "  आणि "जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं" सारखी शायरी प्रवास आनंददायी बनवतात.प्रत्येक वळणावर स्वप्नांची ची मालिका हा प्रवास गुंफत राहतो.कितीही संकटे आली.वादळे उठली आणि उद्ध्वस्त होतो आणि जिद्दी मन उभारी घेवून म्हणते, "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.."मग,माझी धाडस, झपाटलेपण आणि अपार कष्ट करीत चाललेली प्रामाणिक धडपड‌! अशाच प्रकारे मी जगत आलो.तस्संच जगण्यातील कालचा " ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." चा राजभवनावरील लोकार्पण सोहळा म्हणजेच स्वप्नपूर्तीचा आनंद !
या आनंदाला "चार चांद" लावण्याचे काम पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्या निर्मळ प्रेम भावाने, चंद्रकांतदादा पाटील पाटील यांच्या अस्सल व निखळ मैत्रीने,विजयबाबू यांनी " दर्डा स्कूल"च्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर विश्वासू हात ठेवून केले. राज्यपाल महामहीम भगतसिंहजी कोश्यारी यांनी तर माझा नातू अर्जूनला मोठ्या प्रेमाने कडेवर तर घेतले,खवूही भरविला आणि अवघ्या सोहळ्यावर व उपस्थितांवर एक प्रकारे प्रेमाची पखरणच केली.
या सोहळ्याला राज्यातील सुमारे १७०० न्यूज पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सने  स्थान दिले. सर्वच माध्यमांनी दखल घेतली.सर्वांचाच मी ऋणी आहे.

Post a Comment

0 Comments