पंढरपूर शहरात एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याने सोळा लाख रुपयांच्या रकमेवर केला हात साप



पंढरपूर येथे एटीएम मशीन मध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांने सोळा लाख रुपयांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सीएमएम इन्फो सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मोहन दामाजी (रा. इसबावी) असे पैशाचे अपहरण केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.


पंढरपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम सीएमएम इन्फो सिस्टिम लिमिटेड या कंपनीकडे आहे. पंढरपूर एसबीआय शाखेतून विविध एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ३६ लाख रुपये कंपनीचे कर्मचारी आशिष दामाजी व अन्य दोन जण घेऊन गेले होते. पंढरपूर उपनगरातील इसबावी येथे विसावा मंदिर जवळ एसबीआय बँकेचे एटीएम आहे या एटीएम मध्ये सोळा लाख रुपये भरणे गरजेचे होते मात्र त्यात १४ लाख भरण्यात आले. 

कंपनीचे व्यवस्थापक सुहास कांबळे यांनी तपासणी करत असताना इसबावी येथील बँकेचे दोन लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर सदर आशिष दामाजी यास विचारणा केली असता. सदरील रक्कम ही दुसऱ्या एटीएममध्ये भरण्यात आल्याचे सांगण्यात आले तर दुसऱ्या एटीएममध्ये केवळ पाच लाख रुपये भरण्यात आले होते. सर्व गोष्टींची तपासणी केला असता आशिष दामाजी याने सोळा लाख अकरा हजार रुपयेची रकमेच्या अपहरण केल्याचे समोर आले. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments