बार्शी! कारी गावामध्ये बांधावर गवत टाकल्याच्या कारणावरून महिलेला केली दोघांनी मारहाण



कारी गावांमध्ये बांधावर गवत का टाकले म्हणून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सारिका शिवाजी देवकर (वय 35) रा. कारी ता. जि. उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामलिंग पांडुरंग पवार (वय 30) राहुल रामलिंग पवार (वय 35) या दोघा जणांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी आपल्या शेतामधील बांधावरील गवत टाकत होता तू बांधावर गवत का टाकले म्हणून दगडाने  व लाथा बुक्क्याने मारहाण केली व तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी आहे या शेतामध्ये तू पाऊल कसे ठेवते असे "म्हणत जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. अशा आशयाची फिर्याद पांगरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे, या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक मुंडे करत आहेत.

Post a Comment

0 Comments