बार्शीत मोटार ड्रायव्हिंग लायसन घोटाळा राजेंद्र गायकवाड यांच्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल


बार्शी येथील राजेंद्र गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना शिबिर घेऊन मोफत ड्रायव्हिंग लायसन देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केलेप्रकरणी बार्शी शहर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की,बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र. 168/2022 भादंवि कलम 420, 406, 506, 34 मधील आरोपी क्र. 1) राजेंद्र गायकवाड रा. बार्शी, आरोपी क्र. 2) ओम राजेंद्र गायकवाड रा. बार्शी व आरोपी क्र. 3) जोतीराम मोहन जाधव वय 23 वर्षे धंदा नोकरी, रा. बारबोले प्लॉट, बार्शी मुळ रा. सुरडी ता. बार्शी, जि. सोलापूर यांनी संगनमत करून मोफत लर्निंग लायसन्स देणे बाबत फेसबूक वर पोस्ट टाकून तसेच वर्तमानपत्रात बातमी देवून श्री .शिवाजी कॉलेज समोर बार्शी येथे सप्टेंबर 2021 मध्ये शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीरात आरोपींनी त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नसताना गुन्ह्यातील फिर्यादी कडून 1500/- रु स्विकारून फिर्यादीस पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे आश्वासन देवून फिर्यादीस लायसन्स दिले नाही. तसेच फिर्यादीने आरोपीस दिलेले पैसे परत मागितले असता आजपावेतो पैसे देखील परत न देता फिर्यादीची फसवणूक करून फिर्यादीच्या 1500/- रु एवढ्या रकमेचा अपहार केला आहे. सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबा वरून बार्शी शहर पोलीस ठाणे येथे वर आरोपी 1) राजेंद्र गायकवाड आरोपी क्र. 2) ओम राजेंद्र गायकवाड व आरोपी क्र. 3) जोतीराम मोहन जाधव यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

पोलिसांच्यावतीने अवाहन फसवणुक झालेल्यांनी पुढे या
नमूद दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीसांच्या वतीने आवाहन करण्यात येते की,नमुद गुन्ह्यातील फिर्यादी यांचे प्रमाणे जर बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी वर नमूद आरोपीकडे ड्रायव्हिंग लायसन्स साठी पैसे दिले असतील व त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले नसेल किंवा त्यांनी आरोपी कडे दिलेले पैसे परत मिळाले नसतील तर नागरिकांनी न घाबरता बार्शी शहर पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे अवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments