मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर परिसरात अवैध हातभट्टी दारु वाहतुक करणारी वाहने हातभट्टी दारूसह जप्त करुन रु. ३.४५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २२/०३/२०२२ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक व निरीक्षक ब विभाग कार्यालयाने संयुक्त मोहिम हाती घेवुन गुप्त बातमीदारामार्फ़त बातमी काढुन सोलापूर हैद्राबाद रोड, मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर व सोलापूर शहरातील निलमनगर परिसरात हातभट्टी दारुची वाहतुर्क करणाऱ्या एकुण १४ मोटारसायकुल जप्त करुन ६०० लीटर हातभट्टी दारु जप्त करुन ०४ गुन्हे नोंद केले. सदर कारवाईत ०४ आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातुन रु. १,६५,८००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग कार्यालयाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी सापळे रचुन हातभट्टी दारुची वाहतुक करणाऱ्या एकुण ०३ मोटारसायकल जप्त करुन ४८० लीटर हातभट्टी दारु जप्त करुन ०३ गुन्हे नोंद केले. सदर कारवाईत ०३ आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातुन रु. १,७९,६००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
20. संपुर्ण कारवाईत एकुण ०७ वारस गुन्हे नोंद करुन १०८० लीटर हातभट्टी दारु जप्त केली असुन रु.३,४५,४००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. व अटक आरोपीं/वाहनचालकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई निरीक्षक श्री एस. एम. मस्करे, श्री. एस. एस. फडतरे, श्री. एस. एस. कदम दुय्यम निरीक्षक श्री. ए. आर. आवताडे श्री. एस. डी. झगडे,दुय्यम निरीक्षक श्री. जी. आर. होळकर, श्री. एस. ए. बिराजदार व सर्व जवान स्टाफ़ यांनी पार पाडली.
0 Comments