बार्शी! अल्पवयीन मुलीचे अपहरण ; पांगरी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल



पांगरी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घडली आहे. शाळेमध्ये जाते असे सांगून मुलगी गेले व घरी आहे परत मी नाही म्हणून मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज्ञाता विरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेमध्ये जाते असे सांगून मुलगी घरी आली नाही, हे समजल्यावर मुलीच्या वडिलांनी नातेवाईक पाहुणे सगळीकडे शोधाशोध केली परंतु ती कुठेही आढळून आली नाही. इयत्ता 10 वी मध्ये शिकणार्‍या सोळा वर्षे वयाची मुलगी गायब झाल्याची फिर्याद पांगरी पोलिसात दिली आहे. भादवि कलम ३६३ कलमानुसार  अज्ञात व्यक्तीविरोधात पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करत आहेत अशी माहिती एक मार्च रोजी पांगरी पोलिसात तर्फे देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments