ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला 'धक्का' नसून 'धोका' मिळाला; पंकजा मुंडे



बीड :

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल न्यायालयाने नाकारला आहे.
 तसेच, पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला 'धक्का' नसून 'धोका' मिळाला आहे, असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments