अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन हे वातावरण पेटलं आहे. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे, शरद पवार यांच्यावर तर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे.
मलिकांच्या राजीनाम्यावरुन मोर्चे सुरु असून यामागचा महत्त्वाचा हेतू काय आहे, हे नितेश राणेंनी खोचक शब्दांत सांगितलं आहे. आपल्याला विधानसभेत बसलेले महाविकास आघाडीचे सगळे मंत्री, घरातून न निघालेले मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे.
आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भाजपनं आज मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. यामुळे वातावरण चांगलंच तापलं असून भाजप आक्रमक झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, भाजपच्या या आक्रमकपणापुढे ठाकरे सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0 Comments