विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाची सीबीआई चौकशीची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकार या प्रकरणाची सीआईडी चौकशी करण्यावर ठाम आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला. या पेन ड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची माणसं वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली आहेत.
या दोघांमधील संवाद समोर आला आहे. मात्र यादरम्यान नवी माहिती समोर आली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटमधून मोठी माहिती समोर आली आहे.
फडणवीस यांनी दाऊद गँगचा संबंध असल्याचा केलेला आरोप मुदाससीर यांची नियुक्ती फडणवीस सरकारच्या काळात झाली होती, असं त्यांनी ट्विट केलं आहे. वक्फ बोर्डावर नियुक्ती ही 2019 नोव्हेंबरमध्ये झाली होती. हे ही फडणवीसांनी टाकला आणखी एक खळबळजनक पेनड्राइव्ह बॉम्ब; कुणाचे आहेत दाऊदशी संबंध?
त्यावेळी फडणवीस यांचं सरकार होतं. नवाब मलिक यांनी मुलगी सना शेख यांनी फडणवीस आणि मुदाससीर यांचा फोटो ट्विट करत आरोप केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे
0 Comments