देशातील पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये तब्बल ३७ वर्षा नंतर योगीनी सलग दुसऱ्यांदा सता राखण्यात यश मिळवले. आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला.
यामध्ये पाच पैकी तब्बल चार राज्यात भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे. पण देशाचे सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश कडे होते. सर्वांचा एकच प्रश्न होता. योगी सत्ता राखणार की अखिलेश बाजी मारणार? पण अखिलेश यांनी कडवी झुंज दिली असली तरी योगीनी परत एकदा युपी मध्ये आपणच सत्तारुढ होणार आहोत हे दाखवून दिले आहे.
भाजपाचा हिंदुत्ववादी चेहरा असलेले योगी आदित्यनाथांची तरुणाईत मोठी क्रेझ असून आज सकाळपासूनच व्हॉट्सॲप वर योगींचे डीपी व स्टेटस झळकत आहेत. तर योगीना समर्थन देणारे स्लोगन आ रहा है भगवाधारी करो राज तिलक की तयारी, जिने श्री राम को लाया हमने उसको लाया असे असे विविध मिम्स दिवसभर व्हायरल होत आहेत. निवडणूक जरी देशातील पाच राज्यातील असली तरी त्याचा फिवर मात्र महाराष्ट्रात पाहायला मिळाला.
0 Comments