महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने भाजप सरकार येईल


नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच बहुमतापर्यंत मजल मारली आहे. जवळजवळ एकहाती सत्ता भाजपने मिळवलेली आहे. सत्ता विरोधी लहर असताना देखील भाजपला अनपेक्षित यश गोव्यात मिळाले आहे. या विजयाचे शिल्पकार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज त्यांचे पहिल्यांदाच नागपूर येथे आगमन झाले. 

या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की,नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली असून, आज जर निवडणुका घेतल्या तर त्यात भारतीय जनता पक्ष विजयी होईल.2024 मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने भाजप सरकार येईल, असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments