सोलापूर/प्रतिनिधी:
महेश बिराजदार याने मेक्यानिकल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेऊन प्रिसिजन कॅमशाफ्ट चिंचोळी येथे मेक्यानिकल विभागाचा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे, मात्र त्याच्याकडून इलेट्रिक विभागाचा काम त्याला येत नसल्याचे सांगून देखील बळजबरीने कामावरून काढण्याचे धमकी देत डेप्युटी मॅनेजर आर टी कोळेकर आणि एम थ्री असिस्टंट मॅनेजर एस एम माळवदकर यांनी आणखी दोन साथीदारासह करून घेत असताना महेश बिराजदार याला शॉक बसून तो भाजला.
त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले कंपनी कडून थोडेच दिवस उपचार मिळाले त्यांनतर कुटुंबियाणी स्वखर्चातून उपचार चालू ठेवले जवळचे सगळे पैसे संपल्याने त्यांनी महेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी आरोपीचे नावे वगळून व चुकीचा जबाब लिहून महेशचा अंगठा घेतला आणि एफायर दाखल केल्याचे आणि वेळोवेळी कुटूंबीयांवर कंपनीकडून दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात बोलताना सांगितले.
0 Comments