बार्शी शहरांमध्ये बेकायदा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर यांनी छापा टाकून जुगार साठी लागणाऱ्या साहित्य रोख रक्कमही जप्त करून दोन जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी मटका कारवाई करत असताना पाण्याची टाकी पंचायत समीती जवळ येथे आलो होते, त्यावेळी त्यांना गुप्त बातमी बातमी मिळाली, बार्शी शहर येथील सोलापुर रोड कैकाडी चाळ येथे जोया पान शप येथे एक इसम हा रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांकडून अंदाजे येणारे अंक अकडयावर पैसे लावून घेवून कल्याण मटका नांवाचा मटका घेत आहे अशी खात्रीशीर बातमी आहे.
अशा बातमीवरून बार्शी दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेवून त्यांना वरील हकीकत सांगून ते पंच म्हणून तयार झाल्याने त्यांचे सोबत पंचनाम्यासाठी लागणारे साहित्य लपटप, प्रिंन्टर सोबत घेवून बार्शी येथील पाण्याची टाकी पंचायत समीती जवळ येथून सरकारी वाहनाने निघून बातमीच्या ठिकाणी आलो असता सोलापुर रोड कैकाडी चाळ येथे जोया पान शप येथे बसून एक इसम काही तरी आकडेमोड करीत असलेला दिसला, त्याचा आम्हांस बातमी प्रमाणे संशय आल्याने त्यास जागीच पकडले.
पंचासमक्ष सदर इसमास नांव गांव पत्ता विचारता त्याने त्याचे महेबुब मुसा शेख , (वय ३१) रा. सोलापुर रोड कैकाडी चाळ बार्शी जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचे कब्जात कल्याण मटका नांवाचा जुगार खेळून आलेली रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे,1) 1200/रूपये रोख र. मटका जुगार खेळून आलेली त्यात 200,100,50 रू.दराच्या चलनी नोटा. 2) 00.00 एक पांढ-या रंगाचा कागद त्यावर सुरूवातीस ा असे लिहिलेले असून खालच्या बाजुस सुरूवातीस 52 10 असे अंक लिहिलेले आहे, कागदावर अंक अकडे लिहिले असून कागदाच्या शेवटी 94 10 असे अंक लिहिलेले आहे.तसेच कागदाच्या पाठीमागील बाजुस सुरवाजीस 44 10 अंक लिहलेले व शेवटी कागदावर 140 10 असे अंक लिहिलेल3) 05.00एक निळया रंगाचा निळया शार्इचा जूना वापरता बल पेन 1205.00 रूपये येणे प्रमाणे रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य यातील इसमाचे ताब्यात मिळून आल्याने ते गुन्हयाचेकामी सपोनि/नागनाथ ज.खुणे यांनी जप्त करून ताब्यात घेवून त्यावर पंचाचे व पोलीसांचे सहयाचे कागदी लेबल लावलेले आहे.
पंचासमक्ष यातील इसम नामे महेबुब मुसा शेख , वय ३१ वर्षे धंदा मजुरी रा. सोलापुर रोड कैकाडी चाळ बार्शी जि. सोलापूर यास मटका बुकी मालका बाबत विचारपूस केली असता त्याने अनंत उर्फ लखन विघ्ने हा बुकी मालक असल्याचे सांगितले.तरी वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे १) महेबुब मुसा शेख , वय ३१ वर्षे धंदा मजुरी रा. सोलापुर रोड कैकाडी चाळ बार्शी जि. सोलापूर याने रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांकडून अंदाजे येणारे अंक अकडयावर पैसे लावून घेवून बेकायदेशिर कल्याण मटका नांवाचा जुगार खेळत असताना त्याचे कब्जात रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य २५० रू. मिळून आले म्हणून त्याचे विरूध्द व त्याचा बुकी मालक २) अनंत उर्फ लखन विघ्ने या दोघांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments