सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरामणी गावचे हद्दीत बोरामणी ते दर्गनहळ्ळी रस्त्यावर असणारे हिरजे वस्ती येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ७ इसमांनी वस्तीमध्ये घुसुन फिर्यादी व त्यांचे पती यांना काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यातील एकाने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात लोखंडी रॉडने दोन वेळा मारले.तसेच दुस-याने वीट फेकून मारली.यामध्ये ते मयत झाले असून त्यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने,मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ८८ हजार रूपयांचा माल जबरी चोरी करून घेवून गेले आहेत.त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे भा. द.वि.क. ३९७,३९६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयामध्ये एकूण ७ आरोपी असून ते वयाने २० ते २५ वर्षे वयाचे आहेत.त्यांचा बांधा सडपातळ असून अंगात हाफ बाह्याचा शर्ट व नेसण्यास फुल पॅन्ट असा पेहराव आहे.सदर आरोपींचा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून शोध सुरू असून गुन्हयातील आरोपींबाबत कोणाकडे माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या 97 02 91 95 95 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या 79 72 71 32 92 तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण घुगे यांच्या 94 22 45 84 55 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आरोपींची अचूक माहिती कळवणार्या इसमाचे नाव हे कोठेही उघड करण्यात येणार नसून त्याला ५० हजार रुपये रोख रक्कम बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
ही माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडून शुक्रवार दिनांक 11 मार्च रोजी प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
0 Comments