बार्शी उस्मानाबाद रोडवर इंदापूरजवळ बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी



बार्शी उस्मानाबाद रस्त्यावर इंदापूर गावानजीक बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही 18 मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली आहे, जखमीस इसमावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत तो अद्यापही शुद्धीवर आलेला नाही. जखमी इसम नामे प्रकाश सोनवणे (रा. स्वयंवर मंगल कार्यालय जवळ बार्शी नाका, उस्मानाबाद) यांचे जावई अभिजित दिनकर गायकवाड यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस हि परांडा वरून उस्मानाबाद कडे चालली होती तर दुचाकीस्वार हा उस्मानाबाद बार्शी कधी येत होता तालुक्यातील इंदापूर नजीक बस मोटरसायकल स्वराला धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला, यामध्ये स्कूटीचे ही पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे. यामुळे बस चालक इरशाद इस्माईल शेख रा. परांडा यांनी आपल्या ताब्यातील बस हातघाईने, हायगई चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वैराग पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments