सावधान! कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय...



जगभरातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना आता जर्मनीत 1 लाख 98 हजार 888 नव्याने कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा हा आकडा मोठा आहे. चीनमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. जर्मनीच्या राॅबर्ट काॅक संस्थेने मंगळवारी देशात कोरोनाचे 1 लाख 98 हजार 888 रुग्णसंख्येची नोंद केली. 

आठवडाभरापूर्वी हा आकडा 42 हजारापेक्षा कमी होता. आजच्या रुग्णसंख्येबरोबर महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतची संख्या 1.7 कोटी झाली आहे. जर्मनीची लोकसंख्या 8.32 कोटी आहे.

Post a Comment

0 Comments