बार्शी! कासारवाडी रोडवर भर दिवसा महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी हिसकावले


बार्शी शहरातील कासारवाडी रोड येथे नातीला शाळेल सोडण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेचे गंठण भर दिवसा चोरट्याने हिसकावले ची घटना घडली आहे. सदर घटना आहे २ मार्च रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मैनाताई बाळासाहेब सुरवसे (वय ५५) रा शांती नगर कासारवाडी रोड  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या या नातीला स्कूलबसमध्ये सोडणेसाठी  शांतीनगर कर्नर कासारवाडी रोड बार्शी येथे गेल्या होत्या, त्यावेळी अनोळखी तरून मुलगा त्याचेसोबतचे जोडीदारासह काळया रंगाचे मोटारसायकलवरून येवुन मला हातातील वहीचे कागदाची  चिठठी दाखवुन इथ कुसुम बंगला कोठे आहे असे विचारून गळयातील मिनी गंठण व सोन्याची चैन हिसका मारून तोडुन त्यामधील एकुण 9,000/- रू कि. 3 ग्रम वजनाची मिनी गंठणमधील साखळी व सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेली आहे. दोघाला माझ्यासमोर उभे केले असता मी त्यांना ओळखू शकते असेही फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक इंगोले हे करत आहेत. त्यामुळे त्यात दोन अज्ञाताविरुद्ध भादवि कलम ३४, ३९२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments