उत्तर सोलापूर :
पुणे रस्त्यावर कोंडी येथे वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून मालट्रकने धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन महिला वारकऱ्यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जनाबाई फुलचंद घाडगे ( ६८, रा. राकेल, ता. तुळजापूर ) व सत्यभामा दिलीप मिसाळ (वय ४८, रा. कदमवाडी, ता. तुळजापूर) अशी मरण पावलेल्या दोन महिला वारकऱ्यांची नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी १२ मार्च रोजी निघाले होते. रात्री सव्वा दहाच्या सुमारास ते शहरातून जात असताना कोंडीजवळ ट्रॅक्टरला पाठीमागून मालट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले होते. त्यातील सहाजणांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान शनिवारी महिला वारकरी घाडगे व मिसाळ या दोघींचा मृत्यू झाला.
0 Comments