उसने घेतलेले पैसे परत दे म्हणत हत्तीज येथे महिलेला दगडाने केली मारहाण; एका विरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल



उसने घेतलेले पैसे परत दे म्हणत बार्शी तालुक्यातील दहा हत्ती या गावामध्ये विधवा महिलेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, सदर घटना आहे 27 मार्च रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे, याबाबत पार्वती राजेंद्र शिंदे वय-35 रा.हत्तीज, ता.बार्शी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या 27 मार्च रोजी सायंकाळी 06:00 वा.चे सुमारास मी माझे घरासमोर बसले असताना नामदेव सुरवसे रा.हत्तीज, ता.बार्शी घरासमोर आला व मला म्हणाला की तु माझ्याकडुन घेतलेले पैसे मला परत दे असे म्हणाले असता मी त्यांना म्हणाले की माझ्याकडे आता पैसे असे नाहीत मी परत पैसे देते असे म्हणाले असता त्याने रागाच्या भरात शिवीगाळ, दमदाटी करत दारात पडलेला दगड घेवून माझ्या डोक्यात डाव्या बाजूला मारला त्यावेळी माझ्या डोक्यातून रक्त आल्याचे पाहून तो तेथून पळून गेला. त्यांना उपचारासाठी वैराग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, प्रथमोचानंतर त्यांनी वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments