वैराग! भाड्याची खोली खाली करायला सांगितली म्हणून वैराग मध्ये महिलेला मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

रुम मालकांने भाड्याची खोली खाली करायला सांगितल्या चा निरोप दिल्यामुळे एका महिलेला पाच जणांनी मिळून लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादी आसमा उस्मान सय्यद (वय २६) रा.म्हत्रे प्लॉट, वैराग यांच्या तक्रारीनुसार पाच जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ही आठ मार्च रोजी दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूम मालक मधुकर पावटे यांनी भाड्याची खोली खाली करायला सांगितल्याचा राग मनात धरून फिर्यादीस लाकडी काठीने  मारहाण केली आहे व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिलेले आहे. याप्रकरणी मीना राजा भाऊ लोहार (वय २५), नागेश राजू लोहार ( वय ३०),संतोष राजेभाऊ लोहार (वय ३१), राधा लोहार (वय २८) व मीना लोहार यांची सून (वय २८) सर्वजण रा.
म्हत्रे प्लॉट, वैराग या पाच जणांविरुद्ध वैराग पोलिसात भारतीय दंड संहिता कलम १४३,१४७, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आळणे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments