परांडा! वाकडी शिवारातून १४ क्विंटल ज्वारीची चोरी


परंडा तालूक्यातील वाकडी येथिल शेतकरी ईश्वर रणपिसे यांच्या शेतातून ४२ हजार रु. किमतीची १४ किंटल ज्वारी चोरी केल्याप्रकरणी परंडा पोलिसात गणेश वळेकर व अमोल वळेकर यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वाकडी येथील ईश्वर रणपिसे यांचे वडील जयसींग रणपिसे यांना दारू चे व्यसन असल्यामुळे आजी सुदमती रणपिसे हिने ३ एकर शेतजमीन ईश्वर हा अज्ञान असतानाच यांच्या नावे केली होती. सदर ३ एकर शेतजमीन ईश्वर यांच्या नांवे असताना वडील जयसिंग रणपिसे यांचेकडुन ३ एकर मधील ८१ आर एवढी जमीन नातेवाईक शहाजी वळेकर यांनी २००५ मध्ये परस्पर खरेदीखत करून घेतले होते. या जमीनीच्या वादाची न्यायालयात सुनावणी होऊन  दि. ११ ऑक्टोबर २१ रोजी ईश्वर रणपिसे यांच्या बाजुने निकाल देत प्रतीवादी गणेश वळेकर, अमोल, वळेकर व किरण वळेकर यांनी वाकडी शिवारातील शेतगटनंबर ३५२ मधील शेत जमीनीत त्यांनी स्वतः किंवा इतरां मार्फत हरकत, अडथळा करू नये, असा आदेश केला होता.
     
निकाल आपल्या बाजुने झाला आसल्याने ईश्वर रणपीसे यांनी चालु हंगामात दोन एकर ज्वारी पेरली होती मात्र सदरील ज्वारीच्या पिकाची मळणी करून गणेश वाळेकर व आमोल वळेकर या दोघांनी ज्वारी घेऊन गेले, असल्याची फिर्याद ईश्वर रणपिसे यांनी दिल्याने परंडा पोलीस ठाण्यामध्ये दोघावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पो. हे. कॉ. कळसाईन करीत आहेत.

Post a Comment

0 Comments