पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर शहरात नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.पंढरपूरच्या सर्व माजी आमदाराचे पुतळ्याचे उभारण्यासाठी राजकारण तापले आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडून सर्व माजी आमदारांचे पुतळे उभारणाचा ठराव मंजूर केला आहे. या विरोधात पंढरपूर येथील सर्व पक्षीय नेत्यांनी मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पंढरपूर शहरात पुतळ्याचे राजकारण चालू झाले आहे.
पंढरपूर नगरपरिषदेवर गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकांची नेमणूक केली आहे. पंढरपूर नगरपरिषदेवर परिचारक गटाची सत्ता आहे. दोन महिन्यांत आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंढरपूर येथील सर्व आमदारांचे पुतळे उभारण्यासाठी एक मताने मंजुरी दिली होती. त्याला पंढरपूर येथील सर्व पक्षीय नेत्यांनी विरोधात केला आहे.
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनसे नेते दिलीप घोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पंढरपूर नगरपरिषदेवर काढण्यात आला. यावेळी सर्व पक्षीय नेते उपस्थितीत होते. यामध्ये सर्व माजी आमदारांच्या पुतळे उभारणीला विरोधात नसल्याचे सांगितले. मात्र ज्या ठिकाणी हे पुतळे उभे केले जाणार आहे. त्याला विरोध असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
0 Comments