सोलापूर! युट्युब वर बघून करत होते चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पिस्तूल व धारदार शस्त्रासह क्राईम ब्रँचने केली अटक



सोलापूर/प्रतिनिधी:

 शहरात गेल्या दीड वर्षांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना सर्रास घडत होत्या.त्यामुळे सोलापूर पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.संशयीत आरोपी हे पिस्तुल आणि धारदार हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करत होते.सोलापूर शहर गुन्हे शाखेने या चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली असता,युट्यूबवरील एपिसोड पाहून चैन स्नॅचिंग करणे शिकले अशी धक्कादायक माहिती आरोपींनी दिली आहे.अनिल शंकर नलवडे(वय 28 वर्ष ,रा.पोतेकर वस्ती,गोतोंडी ता इंदापूर जि पुणे,सध्या रा.कविटगाव,ता करमाळा,जि सोलापूर),राजेंद्र दिनकर बागडे(वय 26 वर्ष,रा.पोतेकर वस्ती,गोतोंडी,ता इंदापूर जि पुणे )या दोघांना अटक केले आहे.यांच्याकडून सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलीसानी 7 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दीड वर्षांपासून सोलापुरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत होते-

गेल्या दीड वर्षांपासून सोलापुरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढले होते.विजापूर नाका पोलीस ठाणे,फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2020 पासून या संशयीत चेन स्नॅचरसनी धुमाकूळ घातला होता.एकटी महिला पायी किंवा दुचाकीवर जाताना हे दोघे त्याचा पाठलाग करून त्या संबंधित महिलेवर हल्ला करत होते.विरोध करणाऱ्या महिलेस मारहाण करत त्याला गुप्ती,पिस्टलचा धाक दाखवत होते.आणि अंगावरील दागिने लंपास करत होते.दुचाकी वाहनावर येऊन दिवसभरात  होतील तितक्या चेन स्नॅचिंग करून जात होते.15  फेब्रुवारी  2022 रोजी ,सोलापूर पुणे महामार्गावर फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वृद्ध महिला आपल्या नातवंडा सह घरी जात होती.त्यावेळी  अनिल नलवडे आणि राजेंद्र बागडे या दोघांनी वृद्ध महिलेस पिस्टलचा धाक दाखवून अंगावरील दागिने घेऊन फरार झाले होते.या घटनेनंतर सोलापूर पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली.आणि एका खबऱ्यामार्फत पक्की माहिती प्राप्त केली.

युट्युबवरील एपिसोड पाहून चैन स्नॅचिंग करण्यास सुरुवात केली-

गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पीएसआय संदीप शिंदे,एपीआय श्रीनाथ महाडिक यांनी एका खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की,सोलापुरात गेल्या दीड वर्षांपासून चेन स्नॅचिंग करणारे दोघे सोलापुरात येणार आहेत.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  जुना पुणे नाका येथे ताबडतोब सापळा लावला.मोटारसायकलवर  दोन संशयीत व्यक्ती सोलापुरात प्रवेश करताना क्राईम ब्रँचच्या पथकाने त्यांना मुख्य चौकातच ताब्यात घेतले.त्यांची अंगझडती घेतली असता,त्यांच्या कडे विदेशी बनावटीचे पिस्टल,चार जिवंत काडतुसे,एक गुप्ती असा मुद्देमाल जप्त केला.आणि चेन स्नॅचिंगबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी युट्युबवरील एपिसोड पाहून ही चेन स्नॅचिंग करण्याची कला अवगत केली असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी 7 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला-

क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी अनिल नलवडे आणि राजेंद्र बागडे या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.पोलिसांनी विविध ठिकाणाहून 254 ग्रॅम सोन्याचे दागिने,एक पिस्टल,चार जिवंत काडतुसे,एक गुप्ती,मोटारसायकल,एक बॅग,एक मोबाईल असा एकूण 7 लाख 78 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली-

दोघा संशयीत आरोपीना ताब्यात घेताना एपीआय श्रीनाथ महाडिक,पीएसआय संदीप शिंदे,शंकर मुळे,संदीप जावळे,संतोष येळे,सुहास अर्जुन,अभिजित धायगुडे,उमेश सावंत,राजू मुदगल,सतीश काटे यांनी केली .तर ताब्यात घेतल्या नंतर मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस हवालदार अंकुश भोसले,संतोष मोरे,इमाम इनामदार,अजय पाडवी,विजय वाळके,महेश शिंदे,तात्या पाटील,राजकुमार पवार आदींनी केली.

Post a Comment

0 Comments