बार्शीमध्ये नणंदेच्या घरी नवविवाहितेची आत्महत्या ; नवविवाहितेचे मुळगाव सिरसाव...


बार्शी/प्रतिनिधी:

लग्न का आमचा योग्य मानपान केला नाही, बांधकामासाठी तिच्या वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असा म्हणत छळ केल्याप्रकरणी नवविवाहितेचा झालेल्या मृत्यू प्रकरणी नवरा, सासू, नणंद व नंदावा अशा पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रीती स्वप्निल देवराम हे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे या प्रकरणी तिचा अमृत गोकुळ ननवरे यांनी बार्शी पोलिसांत फिर्याद दिली आहे त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीतील महेश मोरे यांच्या घरी उपळाई रोड येथे पाण्याच्या हौदात आत्महत्या केली याबाबत पती स्वप्नील संभाजी देवराम, सासू रंजना संभाजी देवराम दोघेही साठे वस्ती, लोहगाव ननंद पूजा वाघ, आनंद वाघ नणंद ज्योती महेश मोरे नंदावा महेश मोरे अलीपूर रोड बार्शी या पाच जणांविरुद्ध भादवि कलम 304, 334 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत प्रीती पुण्यात एका कंपनीत नोकरीला होती, या लग्नात सासरच्यांनी मानपान केला नाही मोबाईल घेऊन बॉयफ्रेंडशी बोलतेय या संशयावरून पती नेहमी त्रास देत होता. बार्शीत आल्यानंतर ही सर्व जण भांडत होते, या त्रासाला कंटाळून तिने पाण्याच्या हौदात आत्महत्या केली आहे, तिने आत्महत्या केली की घातपात केला असाही संशय फिर्यादीत नमूद केला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करत आहेत.

Post a Comment

0 Comments