बार्शी ! जीवनदत्त आरगडे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून हाकलपट्टी




बार्शी येथील काँग्रेसचे जीवनदत्त आरगडे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे.आरगडे यांना पदावरून काढण्यात आल्याचे वृत्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रद्वारे कळविले आहे.

अधिक माहिती अशी की , दि ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिलादिनी जीवनदत्त आरगडे यांनी फेसबुक या सोशल मिडियावर बार्शीतल्या महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करीत , महिलांची बदनामी केली होती.त्यामुळे आरगडे यांच्यावर बार्शी पोलिस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुंबई मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन येथेही महिलांना दमदाटी , शिविगाळ करून ,बुक्क्यांनी मारहाण केल्याबद्दल विनायभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या शिफारशीवरून जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जीवनदत्त आरगडे यांना पदावरून दूर केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

१२ मार्च रोजी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुगल किशोर तिवारी यांची भेट घेऊन जिवनदत्त आरगडे कारवाई करा अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा दिला होता.

Post a Comment

0 Comments