शिक्षिकेला प्रियकराची एक चूक पडली भलतीच महागात..!



ऑनलाईन जग अतिशय अजब आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपलं पर्सनल आयुष्य लोकांसोबत शेअर करतात. मित्र आणि नातेवाईक कुठेही राहिले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्या सगळ्या अपडेट त्यांना देत राहातात. मात्र अनेकदा यामुळे लोकांचं नुकसानही होतं. यूकेमध्ये राहाणाऱ्या 25 वर्षाच्या एला ग्रिफ्फिथसोबतही असंच घडलं. तिने आपल्या शाळेतील प्रिन्सिपलला खोटं बोलून एका आठवड्याची सुट्टी घेतली. मात्र, फेसबुकने (fb post) तिचं बिंग फोडलं


एलाच्या कलिग्सने फेसबुकमुळे तिचं हे खोटं पकडलं. एलाने अगदी काळजी घेत फेसबुकवर काहीही पोस्ट केलं नव्हतं. मात्र तिच्या प्रियकराने एलाला आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं. यामुळे तिचं खोटं सगळ्यांसमोर आलं आणि एलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं.

प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या एलाने 17 सप्टेंबरला प्रिन्सिपलला आपल्या घरी अतिशय सीरियस प्रॉब्लम झाल्याचं सांगितलं होतं. तिने म्हटलं होतं की तिला स्वतःला सावरण्यासाठी एका आठवड्याचा वेळ हवा आहे. असं सांगून तिने एका आठवड्याची सुट्टी घेतली. प्रिन्सिपलनेही माणुसकी दाखवत तिला सुट्टी दिली. मात्र इथे स्टोरी काहीतरी वेगळीच आहे, याची प्रिन्सिपललाही माहिती नव्हती.

वेल्सच्या अंग्लेसीमधील Ysgol Cybi school मध्ये एला असिस्टेंट प्रोफेसर म्हणून काम करत होती. तिने पर्सनल प्रॉब्लम सांगत शाळेकडून सुट्टी घेतली. मात्र काही काळानंतर तिच्या प्रियकराने फेसबुकवर तिच्यासोबत रोममध्ये सुट्ट्यांची मजा घेतानाचे फोटो पोस्ट केले. यामध्ये ती आईस बारमध्ये दारू पिताना आणि रोममध्ये फिरताना दिसत होती. या प्रकरणाचा तपास केला असता असं समोर आलं की एला खोटं बोलली होती आणि आपल्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. यानंतर स्कूलने तिला नोकरीवरुन काढून टाकलं.

Post a Comment

0 Comments