उस्मानाबाद! दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला शिपाई यांना सहाशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले


कळंब :

दुय्यम निबंधक कार्यालयात ऑनलाइन नकला देण्यासाठी बाराशे रुपयांची लाच मागून तडजोडीअंती सहाशे रूपये लाच घेताना एका महिला शिपाईस एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. सविता उत्तम इर्लेकर (वय 50 वर्षे ) असे या महिला शिपाईचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा कळंब येथे प्लॉट असून, सर्वे नंबर 225 मधील तीन खरेदी क्रमांकाच्या ऑनलाईन नकला मिळणे कामी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय,कळंब येथे अर्ज केला होता. सदर
ऑनलाईन नकला देण्यासाठी यातील आलोसे हिने तक्रारदार
यांच्याकडे पंचासमक्ष 1200/- रुपये लाचेची मागणी करुन
तडजोडी अंती 600/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन 600/-
रुपये लाच पंचासमक्ष स्वतः स्वीकारली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि . उस्मानाबाद यांनी सापळा रचून ही कामगिरी केली आहे. मार्गदर्शक डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस  अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद , प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments