महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे चित्र दिसत असले तरी वेळोवेळी पक्षांच्या ,नेत्यांच्या भूमिका समोर आलेल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात कॉग्रेसचे माजी मंत्री,आमदार नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
''मागील निवडणुकीत प्रचार संपला. मात्र, प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आपल्या मतदारसंघात आले होते,'' असा आरोप नसीम खान यांनी केला.गेल्या विधानसभा निवडणुकी प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे माझ्या मतदार संघात आले. यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ती पक्षाची भुमिका नाही असे या नेत्याने म्हटले आहे.20 ऑक्टोबर 2019 रोजी ही घटना घडली होती. उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब, अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी प्रचाराची वेळ संपल्यानंतर मतदार संघात प्रचार केल्याचा आरोप खान यांनी याचिकेत केला आहे.
0 Comments