पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे.समाजकल्याणाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी यावेळी पाठिंबा दिल्याचे भाजप हे जाणून आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. मोदी यांनी गेल्या साडेसात वर्षात अनुसूचित जाती-जमाती, तरुण आणि महिलांच्या संदर्भात सरकारने केलेल्या कामगिरीची यादी तयार करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. या कामगिरीचा अभ्यास करण्यासाठी मंत्र्यांचा एक गट स्थापन केला जाईल.
देशभरात किती सामाजिक योजना सुरू आहेत, त्यांचा किती नागरिकांना फायदा झाला आणि त्यासाठी बजेटमध्ये किती तरतूद करण्यात आली आहे, याची आकडेवारी पीएमओने सर्व संबंधित मंत्रालयांकडून मागवली आहे. त्याची देशभरात प्रसिद्धी करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याशिवाय ज्या योजना सुरू करायच्या आहेत, त्या सर्व योजनांबाबतही सरकारने विचारणा केली आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
0 Comments