पवारांनी तब्बल ११ वर्षांनी केलं 'हे' काम


राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी माळेगाव येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. विशेष म्हणजे शरद पावर हे ११ वर्षानंतर कारखान्यात आले होते. शरद पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याची सोमवारी पाहणी केली. याआधी २३ एप्रिल २०११ रोजी कारखान्याच्या २१ मेगा व्हॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी पवार आले होते. त्यानंतर सदर कारखान्यावर भाजपाचे चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची सत्ता आली. त्यामुळे शरद पवारांनी कारखान्याकडे पाठ फिरवली होती. 

२०२० साली राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा सत्ता मिळवत  कारखाना ताब्यात आणला. त्यानंतर शरद पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी संचालक मंडळाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना कारखाना चालवताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments