सोलापूर - तोंड लपून फिरणाऱ्या तडीपार इसमास सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलाम १४२ प्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार इसम नामे विठ्ठल रतनसिंग फटफटवाले (रा. बापुजी नगर 3. सदर बझार सोलापुर) त्यास पोलीस उप आयुक्त परिमंडळ यांनी आदेश क्रमांक-3347/2021 दिनांक- 14/10/2021अन्वये सोलापुर शहर व सोलापुर जिल्हयातुन दोन वर्षाकरिता तडीपार केले असताना वरिष्ठाची कोणतेही पूर्व परवानगी न घेता सदर लोकसेवकाच्या तडीपार आदेशाचे उल्लघंन करुन सिध्दार्थ चौक द.सदर बझार सोलापुर शहर येथुन बापुजी नगर काळभैरव मठाकडे आपल्या राहत्या घरी स्वताचे तोंड लपवुन जात असताना मिळुन आला म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल चिदानंद काळजे नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादवरून तडीपार इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments