वैराग! वाहतुकीला अडथळा होईल असे सामान रस्त्यावर लावल्यामुळे ३ जणांवर गुन्हे दाखल



वैराग/प्रतिनिधी:

वैराग शहरामध्ये वाहतुकीला अडथळा होईल असं आपले व्यवसाय थाटून लोकांच्या जीविताला धोका होईल असे दुकान लावल्याबद्दल तिघांजणाविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आकाश हनुमंत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग पोलीस २ मार्च रोजी पेट्रोलिंग करत असताना सरकारी दवाखान्यासमोर सार्वजनिक ठिकाणी एक व्यापारी ट्रेडिंग चे साहित्य लावून वाहतुकीला व लोकांच्या जीवाला आवडता होईल असं निदर्शनास आला, जावेद मनियार बागवान वय ३२ वर्षे रा. वैराग ता.बार्शी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी दवाखाना जवळ पान टपरी चालक संतोष  सोमनाथ लंगोटे (वय २८) रा. वैराग ता.बार्शी तसेच फिरोज जहांगीर तांबोळी (वय ४३) वर्षे रा. वैराग ता.बार्शी  या तिघांवर वैराग पोलिसात वाहतूकीस अडथळा होईल व येणारे जाणारे लोकांना धोका निर्माण होईल अशा स्थितीत लावलेले असताना मिळून आल्यामुळे त्याचेविरुध्द भा.दं.वि. कलम २८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वैराग पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.

Post a Comment

0 Comments