बार्शी! दरोड्याच्या विविध गुन्ह्यातील आरोपी कडून 18 लाखाचा मुद्देमाल हस्तगत : पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते


बार्शी/प्रतिनिधी:

१) मागील सुमारे एक वर्षापासुन बार्शी शहर, सुभाष नगर, वाणी प्लॉट,कॅन्सर हॉस्पीटल परिसरात नागरीकांच्या घराच्या दरवाज्याचा कोयंडा कटावणीने तोडुन, उचकटुन घरात प्रवेश करून घरातील व्यक्तीना मारहाण व चाकुचा धाक दाखवुन घरातील सोन्या चांदीचे दागीने,रोख रक्कम अश्या मौल्यवान चीजवस्तु अज्ञात आरोपी घेवुन गेलेले होते. अश्या प्रकारचे एकुण ०५ दरोडयासारखे गुन्हे घडलेले होते.

२) सदर घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे घडल्या ठिकाणची ग्रामसुरक्षा यंत्रणा स्थापन करून कार्यान्चीत केली.सदर भागात नागरीकांना घेवुन रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्यात आली.

३) सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखा बार्शी कडील दोन पथके तयार करण्यात आली.सदर पथकाने परभणी,सिंदखेड राजा,औरंगाबाद, येथुन काही संशयीत आरोपी आणुन त्याना अटक करून त्याचेकडे गुन्हया बबात सखोल तपास केला.

४) त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे किर्तीनगर अक्कलकोट रोड सोलापुर दरोडयातील काही संशयीत आले असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता तेथे आरोपी क्र.१रा. वैराग ता. बार्शी आरोपी क्र.२ ता.मुरूड जि.लातुर आरोपी क्र. ३ रा. भोसा ता.जि.लातुर
हे मिळुन आले. त्याची घरझडती घेतली असता दरोडे घालण्यासाठी वापरत असलेली हत्यारे व गुन्हयातील
काही सोन्याचे दागीने मिळुन आले. सदर आरोपीना अटक करून त्याचेकडे गुन्हया बाबत सखोल तपास केला असता त्यांनी बार्शी शहरात गुन्हे केल्याची कबुली देवुन दरोडे टाकल्याची ठिकाणे दाखवली. त्याचे इतर साथीदार हे आरोपी क्र.४ व ५ हे रा.वैराग ता. बार्शी आरोपी क्र.६रा. परांडा जि.उस्मानाबाद, आरोपी क्र.७ रा. तुळजापुर उस्मानाबाद हे तपासात निष्पन्न झाले. अटक आरोपीकडुन पोलीस कोठडी दरम्यान गुन्हयातील सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले. सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे ४ व ५ यांना स्थानीक गुन्हे शाखा सोलापुर यांनी वैराग येथे पकडुन बार्शी शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात दिल्याने त्याना अटक केली.
त्यांनी सदर गुन्हयातील सोन्याचे दागीने हे बार्शी शहरातील सराफा यांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सराफ ८ व ९ दोघे रा. बार्शी ता.बार्शी यांना पण गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आलेली असुन त्याचेकडुन काही सोन्याचे दागीने व लगड हस्तगत केली आहे.सर्व आरोपी हे सध्या अटकेत
असुन इतर गुन्हयाचा तपास चालु आहे.

५) आरोपीना अटक करून त्याचेकडे तपास केला असता त्यांनी बार्शी शहरातील खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

१) गु.र.नं.५८/२०२१ भा.द.वी.क.३९५ २) गु.र.नं.२७१/२०२१ भा.द.वी.क.३९५ ३) गु.र.नं. ५६६/२०२१ भा.द.वी.क. ३९५, ४) गु.र.नं. ५९४/२०२१ भा.द.वी.क.३९५, ५) गु.र.नं. ०५/२०२२ भा.द.वी.क. ३९५

दरोडयातील गेला एकुण मुद्देमाल ४४ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागीने (२२,३५,०००) व ३ भार चांदीच्या वस्तु (१२,000) व रोख रक्कम ८५,000/- रोख रक्कम. असा एकुण. २३,३२,000/-
मुद्देमालातील एकुण ३५ तोळे ०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने कि.रू.१७,७०,000/- व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकली कि.रू.७०,000/- असा एकुण १८,४०,000/- रू.चा मुद्देमाल आरोपी

यांचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास अदयाप चालु असुन आरोपीकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर आरोपी यांनी अश्याच प्रकारचे उस्मानाबाद, परांडा, वैराग,माढा जामखेड या भागात गुन्हे केलेले आहेत.

६) सदरचे दरोडयाचे गुन्हे उघड करणेकामी मा. पोलीस अधिक्षक मा. तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक मा. हिमंत जाधव साो, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी मा.डॉ.विशाल हिरे व मा. जालिंदर नालकुल सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके बार्शी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप स्थानीक गुन्हे शाखा सोलापुर,(ग्रामीण), बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि.ज्ञानेश्वर उदार, स.पो.नि.स्वप्नील इज्जपवार, पो.स.ई. प्रविण सिरसाट, सपोफौ. अजित वरपे, पोहेकॉ.अरुण माळी, पोहेकॉ. रेवन्नाथ भांग,पो.ना. मनिष पवार, पो.ना. वैभव ठेगल, पो.कॉ.सचिन देशमुख,पो.कॉ. ज्ञानेश्वर घोंगडे,पोकॉ.अविनाश पवार, पोकॉ.रविकांत लगदिवे पो.कॉ. फिरोज बारगिर, पो.कॉ.अर्जुन गोसावी तसेच सायबर पोलीस ठाणेचे रतन जाधव यांनी सदरची कामगिरी केली आहे.
,

Post a Comment

0 Comments