बारावी पेपरफुटी प्रकरण! व्हॉट्सॲप ग्रुपमधील 'त्या' 17 विद्यार्थ्यांची होणार चौकशी



बारावीच्या रसायनशास्त्राचा पेपर व्हायरलप्रकरणी मालाडमधील खासगी शिकवणी शिक्षक मुकेश यादव अटक केल्यावर ‘त्या’ व्हॉट्सॲप ग्रुपमधील 17 मुलांची चौकशी विलेपार्ले पोलीस करणार आहेत. आरोपीला ज्याने पेपर पाठविला त्याचे मोबाईल चॅट डिलीट केल्याचे तपासात उघड झाले आहे.परीक्षा देण्यासाठी उशिरा आलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीमुळे पेपर लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ही मुलगी दहाच्या पेपरला जवळपास 10 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास पोहोचली. 

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिचा मोबाईल तपासला तेव्हा त्यात असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 17 विद्यार्थी होते. तर दुसऱ्या एका चॅटमध्ये आरोपी शिक्षक यादव याने या विद्यार्थिनीला 15 प्रश्नांची उत्तरे पाठविली, असेही आढळल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आम्ही या विद्यार्थिनीला रसायनशास्त्राच्या पेपरला उपस्थित राहू दिले नाही. परंतु तिला उर्वरित पेपरला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments