social media वर धुमाकूळ, Munde बहिण- भावाचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल



सध्या सोशल मीडियावर (social media) एक फोटो व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला फोटो आहे बीडमधील मुंडे भावा-बहिणीचा. सर्वांनी आतापर्यंत पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील शाब्दिक युद्ध नेहमी पाहायलं आहे.

गेल्याच आठवड्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केली आहे. मात्र आज एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत एका विवाह सोहळ्यादरम्यान दोघं एकत्र एकाच छताखाली आल्याचं दिसलं. अनेकवेळा दोघांना आपण एकाच व्यासपीठावर पाहतो.

social media  मात्र या लग्न सोहळ्यात दोघंही जवळपास दोन तास एकत्रित बसले होते.  धनंजय मुंडे तसंच पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दोघं भावडं एकत्रित दिसले. लातूरमधील कार्निवल हॉटेल येथे हा विवाह सोहळा पार पडला. धनंजय मुंडे सकाळपासून उपस्थित होते. तर दुपारनंतर पंकजा मुंडे या त्यांच्या ताई प्रज्ञा यांच्या सोबत आल्या.

Post a Comment

0 Comments