IPL 2022: अजित आगरकर IPL संघाचे बनले कोच…



मुंबई: भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचे बॉलिंग कोच बनू शकतात. भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. टीम इंडियातूनच सिनियर खेळाडूंनी अजित आगरकरांना बॉलिंग कोच बनवण्याची मागणी केली आहे. लगेच यावर कुठला निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. सध्या पारस म्हांब्रेकडे ही जबाबदारी आहे. अजित आगरकरांना भारतीय संघात कधी रोल मिळणार? या बद्दल स्पष्टता नसली, तरी IPL मध्ये त्याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक कोच म्हणून अजित आगरकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते समालोचक आहेत. समालोचनाची जबाबदारी संपल्यानंतर ते दिल्ली संघासोबत काम सुरु करतील.

मायदेशात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत समालोचकाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होण्यासाठी, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक्त आहे, असे आगरकरने म्हटलं आहे. रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच आहेत, तर ऋषभ पंत कर्णधार आहे.

“मी भाग्यवान समजतो, मी एक खेळाडू होतो. मी आता दुसऱ्या भूमिकेत येत आहे. आमच्याकडे युवा आणि उत्तम खेळाडूंचा भरणा असलेला एक चांगला संघ आहे. ऋषभ पंत सारखा प्रतिभावान खेळाडू कर्णधार आहे” असं अजित आगरकर म्हणाले.

अजित आगरकरचा रेकॉर्ड

अजित आगरकर सध्या क्रिकेट एक्सपर्ट म्हणून वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडत असतात. अजित आगरकर यांच्याकडे भारताकडून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. 1998 ते 2007 या काळात आगरकर भारताकडून 28 कसोटी, 191 वनडे आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 47.32 च्या सरासरीने त्यांनी 58 विकेट घेतल्या आहेत. वनडेत 27.85 च्या सरासरीने 288 विकेट आणि चार टी-20 सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. 44 वर्षीय अजित आगरकर मागच्यावर्षी चीफ सिलेक्टर बनण्याच्या शर्यतीत होते. सध्या ते टीव्ही कॉमेंटेटर आहेत.

Post a Comment

0 Comments