‘बायको असावी तर अशी!’ Genelia साठी रितेशची खास पोस्टरितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा हे बॉलीवूडमधलं हॅप्पी कपल. गेली दहा वर्ष आपण त्यांना पाहतोय त्यांच्या दोघांमधील नातं वर्षागणिक मजबूत होताना दिसत आहे. ते दोघे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळतात. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओना चांगला प्रतिसादही मिळतो. आज दोन मुलांचे आई-बाबा झाल्यानंतरही नवरा-बायको म्हणून त्यांनी आपल्या नात्यातील गोडवा कायम ठेवला आहे. हेच तर असतं सुखी संसाराचं सूत्र. आज जेनेलिया-रितेशच्या लग्नाचा वाढदिवस. लग्नाच्या दहाव्या वर्षाच्या निमित्तानं रितेशनं जेनेलियासाठी  एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यानं जेनेलियाविषयीच्या आपल्या मनातील भावना या पोस्टच्या माध्यमातून लिहिल्या आहेत.

त्यानं यो पोस्टमध्ये लिहिलं आहे,”तुझी सात मला लाभणं हा मला मिळेलेला मोठा आशीर्वाद आहे असं मी म्हणेन. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण दोघांनी एकत्र मिळून आनंद,दुःख,संकटं,हसणं,रडणं,भीती,अडचणी अशा सगळ्या गोष्टींनी भारलेला प्रवास केला आहे. तु माझ्यासोबत असलीस की मी जगातील कुठलीही अशक्य गोष्ट सहज शक्य करू शकतो हा विश्वास मला मिळतो. धन्यवाद, तु गेली दहा वर्ष माझ्यासोबत आहेस त्याबद्दल. आय लव्ह यू जेनिलया…” रितेश ने जेनेलियासोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्या फोटोत दोघे समुद्रकिनाऱ्या नजीक एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. रितेशने अलिकडेच पोस्टमध्ये लिहिलं होतं त्याच्या आगामी ‘वेड’ या सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं तो आणि जेनेलिया सध्या मुंबईबाहेर आहेत. ते सध्या त्या चित्रकरणात व्यस्त आहेत. त्याने त्या सेटवरील काही फोटोही पोस्ट केले होते.

रितेश-जेनेलियाची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे. रितेश हा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा म्हणून अधिक ओळखला जायचा. त्याचवेळी तो आणि जेनेलिया त्यांच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं बाहेर शूटसाठी गेले होते. रितेश मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून आपल्याला रुबाब दाखवेल असा समज झाल्यानं जेनेलियानं त्याच्या आधी स्वतःच रुबाब दाखवायला सुरुवात केली. म्हणजे ती फार बोलायची नाही स्वतःहून.जेवढ्यास तेवढं बोलणं करायची. पण जेव्हा तिला कळलं की याच्यात मुख्यमंत्र्याचा मुलगा असण्याचा कुठलाही अहमपणा नाही तेव्हा मात्र त्यांच्यात पुढे छान मैत्री झाली आणि मग हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांनी २०१२ मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. आज त्यांना दोन छान मुलं आहेत. आणि आपल्या सर्व मराठी रुढी-परंपरा सांभाळत हे दोघे नवरा-बायको आपलं बॉलीवूड-मराठीतलं फिल्मी करिअरही उत्तम सांभाळत आहेत. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments