Cricket मधली भावा-बहिणीची हिट जोडी, IPL पासून वर्ल्ड कपही गाजवला



क्रिकेटमध्ये पुरुषांनंतर आता महिलांनीही दबदबा तयार केला आहे. पुरुष टीममध्ये विराट कोहलीपासून रोहित शर्मानी मोठे रेकॉर्ड केले आहेत. तर महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाही कोणाच्या मागे नाही. काहीच दिवसांपूर्वी तिला प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.

 स्मृती मंधाना दोनवेळा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळवणारी जगातली दुसरी खेळाडू आहे. वर्ल्ड कपमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती, पण 2020 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. स्मृतीचा भाऊ श्रवण मंधानाही क्रिकेट खेळायचा, पण त्याला यश मिळालं नाही. आता तो स्वत:ची अॅकेडमी चालवत आहे.

 स्मृती मंधानाला यावर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्येही निवडण्यात आलं आहे. 25 वर्षांची मंधाना आक्रमक बॅटिंग करते. वनडेमध्ये तिच्या नावावर 2300 पेक्षा जास्त रन आहेत, तर टी-20मध्ये तिने 2 हजार रन केले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिचा स्ट्राईक रेट 121 चा आहे.


 वॉशिंग्टन सुंदरही भारताचा युवा आणि प्रतिभा असणारा खेळाडूही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्येही कमी काळातच त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरची बहीणही क्रिकेट खेळते. सुंदरची बहीण तामिळनाडूकडून क्रिकेट खेळली आहे, पण तिला टीम इंडियामध्ये स्थान मिळवता आलं नाही.

 Cricketवॉशिंग्टन सुंदरने भारताकडून 4 टेस्ट, एक वनडे आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. 22 वर्षांच्या या ऑफ स्पिनरने त्याच्या करियरमध्ये एकूण 98 टी-20 मॅचमध्ये 72 विकेट घेतल्या. याशिवाय 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 866 रनही केल्या आहेत. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 3 अर्धशतकं आहेत.

Cricketडावखुरा स्पिनर पवन नेगीला आयपीएल 2016 च्या लिलावात दिल्लीने 8.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्यावेळी पवन नेगी बराच चर्चेत आला होता, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्लीच्या पवन नेगीची बहीण बबिता नेगीही दिल्लीकडून क्रिकेट खेळते. बॉलर म्हणून तिचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मागच्या मोसमात ती टीमची कर्णधारही होती.

Post a Comment

0 Comments