पंढरपूर! मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व शहरात मांस, मटण विक्रीस मनाई


 
पंढरपूर/प्रतिनिधी:

 माघ  शुध्द एकादशी १२ फेब्रुवारी २०२२ ला असून माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकरी व भाविकांकडून नामदेव पायरी व मंदीर परिसरात नारळ विक्री व फोडण्यास मनाई आहे. शिवाय माघी वारी कालावधीमध्ये पंढरपूर  शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, नारळाची साल मंदीर परिसरात टाकल्याने तसेच नारळ  फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी फौजदारी संहितेच्या कलम १४४ अन्वये दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई आहे. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १चे कलम १४४ अन्वये  दिनांक ११ ते  १३३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments