धक्कादायक! 'त्या' विवाहितेची केली हत्या ; हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव उघडकीस पतीसह चोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील विष्णू नगर (गाळण) येथे मनीषा चेतन राठोड (वय २४) या विवाहितेच्या मृत्यूच्या कारणाचा शवविच्छेदनानंतर उलगडा झाला आहे. मनीषा राठोड यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पाचोरा तालुक्यातील विष्णू नगर येथे कुंडाणे तांडा येथील माहेर असलेल्या मनीषा राठोड हिचा ४ फेब्रुवारीला रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

मात्र, मनीषाच्या गळ्यावर दोरी आवळ्याच्या व नखे लागल्याच्या खुणा आढळल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार याने मनीषाचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता ते जळगाव इन-कॅमेरा करण्याची मागणी केली हाेती. दरम्यान, मनीषाला ९ महिन्यांचा यश नावाचा मुलगा आहे. त्यास पती चेतन राठाेड याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments