पणजी/प्रतिनिधी:
गोव्यातील संस्कृती, मुळ घराणी, कुलदैवत यांचा महाराष्ट्राशी थेट संबंध आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नेहमीच गोव्यावर प्रेम राहिले आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्हाला गोव्यात संधी द्या, असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोव्यातील जनतेला केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दक्षिण गोव्यातील मुरगाव येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, 'या राज्याशी आपलं वेगळं नातं आहे. कित्येक जणांचे कुलदैवतं, मंदिरं, गावं, घरं इथे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसं सांगितलेलं आहे की भूमिपुत्रांना न्याय द्या, तेच काम आपण आज इथे करण्यासाठी आलेलो आहोत. जरी आज आपलं महाराष्ट्रात राज्य असेल, सरकार असेल आपण सगळे प्रचारासाठी तिथून आलेलो असू, तरी जेव्हा गोवा बद्दल आपण बोलतो, तेव्हा आपण प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहोत.
हा मी तुम्हाला शब्द देण्यासाठी आलेलो आहे. आम्हाला येथे नवीन गोवा निर्माण करायचा आहे. त्यासाठी मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्हाला एक सुंदर गोवा निर्माण करायचा आहे, जो गोवा संस्कृतीप्रधान असणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी भाषणा म्हटले.
0 Comments