"झुकेगा नही सालाचा" बार्शीत दुष्परिणाम जामगावांत व्याहीला लोखंडी पाईपने मारले

बार्शी : मराठी नुकताच दक्षिणात्य चित्रपट पुष्पा प्रचंड गाजला आणि त्यातील सर्व डायलॉग आणि गाणी सुद्धा गाजली यातीलच मै झुकेगा नही साला हा डायलॉग तर अबाल वृद्धांना खूप आवडला. काही नागरिक रोजच्या आपल्या वागण्यामध्ये या डायलॉग चा उपयोग करत आहेत आता या डायलॉगमुळे बार्शीत चांगलीच भांडणं झालेली बघायला मिळाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी जामगाव (आ) या ठिकाणी राहणारे हरी नवनाथ आडसूळ यांनी फिर्याद दिली आहे. नवनाथ हरी अडसूळ यांची मुलगी पूर्वा हीचे लग्न अडसूळ यांच्या घरासमोर राहणारे शिवाजी पेठाडे यांचा मुलगा प्रतीक पेठडे यांच्या सोबत झालेले आहे व त्यांचा  संसार चालू आहे मात्र हरी अडसूळ हे आपल्या घरासमोर लहान मुलांबरोबर खेळत असताना झुकेगा नही साला हा पुष्पा चित्रपटांमधील डायलॉग व गाणे म्हणत होते. 

 याचाच राग त्यांच्या घरासमोर बसलेले त्यांचे व्याही शिवाजी पेठाडे यांना आला आणि हा डायलॉग मला बघून मनाला आहेस म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले यावेळी अडसूळ याना लोखंडी पाइपणे  शिवाजी पेठाडे यांनी मारहाण केले आहे तर अडसूळ यांची पत्नी ही सोडविण्यास आली असता तिला ही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे हा प्रकार 21 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 च्या वाजणार घडला आहे याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यांमध्ये शिवाजी पेठाडे, वेताळ पेठाडे, सारंग पेठाडे,  प्रतीक पेठाडे  सर्व राहणार जामगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments